Your Profile is 100% Completed

Harshad Vora


State: Maharashtra
Loksabha Seat: Baramati
Education Detail: B.Com
Profession Detail: IT professional
Criminal Case: No
Income: 1L - 10 L
Total Votes: 47

Manifesto


जाहीरनामा-घोषणापत्र   बारामती लोकसभा मतदारसंघातील  मला या भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या एसटी व शहरी बससेवा तसेच रेल्वेसेवा ही अधिक सक्षम करावयाची आहे.  तसेच याठिकाणी औद्योगिकीकरणाचे जाळे निर्माण करून त्याद्वारे बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून प्रत्येक मुलामुलींना दर्जेदार प्राथमिक, उच्च तंत्रज्ञान आणि व्यवसायाभिमुख व कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी मार्गदर्शन केंद्रे उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.जवळच्याजवळ उद्योग व्यवसाय सुरू होण्यासाठी बारामती एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी आणि त्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न असतील.उद्योगांसाठी जशी मदत होणार आहे तशीच शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विकासासाठी अर्थसहाय्य मिळवून देणे तसेच शेतीचे तंत्रज्ञान आणि शेती मालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी देखील विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.या भागातील तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळून येथील व्यावसायिकांना त्याचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी या स्थळांचा विकास करुन येथील पर्यटनाला चालना देणार आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या बारामती मतदारसंघातील शहरांचा पुढील ५० वर्षांचा विचार करुन वाढते शहरीकरण आणि नागरिकरणास अनुकूल अशा सक्षम पायाभूत सुविधांसह विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.जेणेकरुन भविष्यातील अडीअडचणींवर मात करता येईल.मतदार संघातील इंदापूर शहरातील डाळींब व द्राक्षे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणीसाठी तसेच ते सुस्थितीत राहण्यासाठी शीतगृहांची उभारणी करणार आहे.मतदार संघातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमध्ये सुधारणा करून जल संधारणाचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.मतदार संघातील सर्व शहरांचा मास्टर प्लॅन तयार करून सर्वांगीण असा सुनियोजित विकास करणार आहे.इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू करुन रखडलेली लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना मार्गी लावणार आहे.मतदार संघातील ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या रोहीडेश्व़र आणि रायरेश़्वर या स्थळांचा पर्यटन स्थळे म्हणून विकास करणार आहे.भोर एमआयडीसी चालू करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.फुरसुंगी येथील कचरा डेपोचा प्रश़्न प्राधान्याने सोडविणार आहे.तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात मोबाईल टॉवरच्या उभारणीतून जाळे निर्माण करण्यात येणार आहे.पाण्याचा प्रश़्न सोडविण्यासाठी निरा देवधर धरणाचे कालवे पूर्ण क्षमतेने सुरू करणार आहे.मतदार संघातील खेड्यांमध्ये शहरांच्या धर्तीवर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात येणार आहे.  लवकरात लवकर विशेष प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे.